भारतातील प्रथम महिला सैन्य मुत्सद्दी म्हणून विंग कमांडर अंजली सिंगांची लागली वर्णी

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर अंजली सिंग ह्या भारतीय हवाई दलातल्या प्रथम महिला अधिकारी बनल्या आहेत. अंजली सिंग सध्या परदेशात भारतीय मिशनमध्ये सैन्य मुत्सद्दी म्हणून तैनात आहेत.अंजली सिंग ह्यांना 10 सप्टेंबर 2019 रोजी रशियाच्या भारतीय दूतावासात ‘डिप्टी एअर अटॅची’ म्हणून नियुक्त केले गेले आहे. या पदावर असताना त्या भारतीय हवाई दल आणि रशियाचे सरकार यांच्यामधला दुवा म्हणून काम पाहणार.

विंग कमांडर अंजली सिंग यांनी मिग-29 या लढाऊ विमानाचे प्रशिक्षण घेतलेले आहे. त्या AE(L) अधिकारी असून त्यांची 17 वर्षांची सेवा आहे.सैन्य भरतीची योजना भारतीय सैन्यात व्यापकपणे आखली जात आहे. भारतीय लष्कराची लष्करी पोलिसात दर वर्षी 100 महिला सैनिक भरती करण्याची योजना आहे. पुढील 17 वर्षांत सैन्य पोलिसांसाठी 1700 महिला सैनिक तयार करणे हे उद्दीष्ट आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
'तृप्ती देसाईंवर अश्लील टीका इंदुरीकरांच्या सूचनेनुसारच' ; तासगावात तक्रार