मुंबई: राज्यात आता किराणा दुकानांमध्ये जर तुम्हाला वाईन (Wine) विकायला ठेवलेली दिसली तर आश्चर्य वाटू देऊ नका. राज्य सरकार आता वाईन किराणा दुकानांमध्ये देखील विकायला परवानगी देऊ शकते. त्यामुळे मनाची तयारी आधीच करून ठेवा की ‘त्या’ बाटल्या सुद्धा आता जनरल स्टोरमध्ये (General store) बघायला मिळू शकतील. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी असा निर्णय घेण्यात येऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे.
राज्याचा हा वाईन प्रस्ताव आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला तर सुपर मार्केट (Super Market), वॉक इन स्टोअर आणि जनरल स्टोअरमध्ये वाईनची विक्री करणं शक्य होणार आहे. आज दिनांक २७ जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत या संबंधी चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत इतर अनेक महत्वाच्या विषयांवर देखील चर्चा केली जाणार आहे.
दरम्यान, भाजपकडून या वाईन (BJP against Wine) प्रस्तावाला विरोध असल्याचे देखील भाजपने जाहीर केले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने वाईन विक्रीबाबत नवा प्रस्ताव मान्य केल्यास भाजपकडून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. आता या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय योग्य असला तरी देखील याला कितपत प्रतिसाद मिळेल याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- साऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”
नितेश राणेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन
नितेश राणेंच्या जामीन अर्जावरील निकालानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
औरंगाबाद होणार ‘कचरामुक्त’; महापालिकेने केले नव्या प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन!
मालेगावात काँग्रेसला जोर का झटका; २८ नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश