fbpx

मुंबईतील सर्वच्या सर्व ३६ जागा जिंकून दाखवू, मुख्यमंत्र्यांचा निर्धार

मुंबई : गेली विधानसभा निवडणूक भाजप — शिवसेने स्वतंत्र लढविली होती. मात्र, आता दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील सर्वच्या सर्व ३६ जागा जिंकून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर मुंबई भाजपा अध्यक्षपदी आमदार मंगलप्रभात लोढा यांची नुकतीच नियुक्ती जाहीर झाली. दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळत मंगलप्रभात लोढा यांनी देखील मुंबईतील सर्वच्या सर्व ३६ जागा जिंकण्याचे आपले लक्ष्य आहे असं नमूद केलं. आपण निवडणुकीच्या निकालातून आपली निवड सार्थ ठरवून दाखवू, असा विश्‍वास लोढा यांनी व्यक्त केला.