इंग्लंडच्या खेळपट्टीवर विल्यमसनची सुमार कामगिरी, डब्ल्युटीसी सामन्यात भारताला होणार फायदा

मुंबई : संपुर्ण क्रिकेट जगताना उत्सुकता लागली आहे ती जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. हा सामना १० दिवसावर ठेपुन आला आहे. भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहे. यादरम्यान इंग्लंड आणि न्युझीलंड संघादरम्यान दोन कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहीला.

यादरम्यान न्युझीलंडच्या संघाचा कर्णधार केन विल्यमसनचे इंग्लंडच्या भूमिवरील आकडे समोर आले आहे. डब्ल्युटीसी अंतिम सामन्याची तयारी करणाऱ्या भारतीय संघासाठी हे आकडे दिलासा देणारे आहे. कारण केन विल्यमसनने इंग्लंडमधील मागील १० कसोटी डावात अपयशी ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही त्याला सुर गवसला नाही. इंग्लंड विरुद्ध दोन्ही डावात विल्यमसन १३ आणि १ इतक्याच धावा काढण्यात यशस्वी झाला.

इंग्लंडमध्ये विल्यमसनने मागील ५ कसोटी सामन्यातील १० डावात फलंदाजी करताना केवळ २६१ धावा केल्या आहेत. दरम्यान केनची फलंदाजी सरासरी केवळ २६.१० इतकी राहिली आहे. त्याच्या तुलनेत भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने जास्त सरासरीने फलंदाजी करताना धावा केल्या आहेत. भुवनेश्वरने ५ कसोटी सामन्यांतील १० डावात फलंदाजी करताना २७.४४ च्या सरासरीने २४७ धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

IMP