सामन्यानंतर दिसली विल्यमसन आणि कोहलीची मैत्री ; सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

virat villymasan

इंग्लंड : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) विजेतेपद मिळवण्याचे विराट ब्रिगेडचे स्वप्न भंगले आहे. न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव केला. यासह न्यूझीलंडच्या संघाने विजेतेपद मिळविले आणि विराट ब्रिगेड आयसीसी करंडक जिंकण्यात चुकला.

सामन्यानंतर कोहली म्हणाला, ‘केन विल्यमसन आणि न्यूझीलंडच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. त्यांनी जबरदस्त खेळ दर्शवला आणि तीन दिवसांपेक्षा थोड्या दिवसात निकाल मिळविला. त्यांनी आमच्यावर दबाव आणला. ते जिंकण्यासाठी पात्र होते. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी त्यांची रणनीती उत्तम प्रकारे पार पाडली.’ यावेळी कोहलीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची प्रशंसा देखील केली आहे.

नंतर न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनने कोहली आणि भारतीय संघाचे कौतुक केले आहे. विल्यमसन म्हणाला, ‘मी विराट आणि भारतीय संघाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तो एक अविश्वसनीय संघ आहे, आम्हाला माहित होतं त्यांच्या सोबतचा सामना आव्हानात्मक असेल. आमचा संघ विजय नोंदविण्यात यशस्वी झाला याचा मला आनंद आहे.

पुढे विल्यमसन म्हणाला, ‘ही खूप खास भावना आहे. आमच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच आपण विश्वविजेतेपद जिंकले आहे. गेल्या दोन वर्षात आमच्या संघाशी संबंधित प्रत्येक खेळाडूने यात एक भूमिका बजावली आहे. ही एक विशेष कामगिरी आहे.’

सामन्यानंतर केन आणि विराट यांच्या एकफोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोत केन आणि विराट कडून दाखवण्यात आलेल्या खेळाडू वृत्तीने सर्वांचीच मनं जिंकली दोघांचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IMP