fbpx

रस्त्यावर उतरल्या शिवाय भाव द्यायचा नाही असं ठरवल का? धनंजय मुंडे

dhanajay munde image

टीम महाराष्ट्र देशा : भर पावसात शेतातील कामे सोडून शेतकऱ्यांना दुध रस्यावर ओतून आंदोलन करावे लागत आहे. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था असताना दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्स ची डेअरी आणि पतंजलीचे दुध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल विधान परिषदेचे विरोधी नेते धनंजय मुंडे यांनी केला. राज्यात उकळी फुटलेल्या दुध दर वाढीच्या आंदोलनाच्या अनुषंगाने ते विधानपरिषदेत ९७ अन्वये उपस्थितीत अल्पकालीन चर्चेत ते बोलत होते.

देशातील पहिला शेतकरी संप हा राज्यात झाला. मार्च महिन्यात मुंबईच्या विधान भवनावर शेतकऱ्यांचा पायी मोर्चा आला आणि आता शेतकरी दुध रत्यावर ओतत आहेत. प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरल्या शिवाय भाव द्यायचा नाही असं ठरवल आहे का? असा प्रश्न देखील यावेळी त्यांनी सरकारला केला. आंदोलन करून देखील सरकार मलम पट्ट्यांचे धोरण आखण्याचे कार्य करत आहे. २६ जून २०१७ रोजी गाईच्या दुधाला २७ रुपये आणि म्हशीच्या दुधाला ३६ रु बाजार घोषित केला. प्रत्याक्षात मात्र दुधाला १७ रु बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरत आहे.

दुग्ध विकास राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी काल वक्तव्य केल की शेतकरी दुधात पाणी टाकतात. या वक्तव्याचा समाचार घेताना नागपूरचे सरकार शेतकऱ्यांचे दु:ख, वेदना समजत नाहीत. मात्र दुधातले पाणी कसे दिसते? शेतकऱ्यांना आंदोलनाची थट्टा करणाऱ्या मंत्र्यांचा समाचार घेतला. दुधाला ५ रुपये थेट अनुदान द्या दुध भुकटी निर्यातीच्या अनुदानात दुप्पट वाढ करा. हे अनुदान दोन महिन्यांसाठी कायम ठेवण्याची मागणी ही धनंजय मुंडे यांनी केली.

जन्मदिन विशेष : महाराष्ट्राच्या राजकारणातील मुलुखमैदानी तोफ धनंजय मुंडे

सत्ता, पैसा, धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा भाजपकडून प्रचंड गैरवापर- सचिन सावंत