विलास लांडे लोकसभा निवडणूक लढविणार की नाही सस्पेन्स कायम

टीम महाराष्ट्र देशा – शिरुर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे हेच उमेदवार म्हणून सध्या चर्चेत आहेत. शिरुर मतदारसंघात पक्ष अन् परिवर्तनासाठी मी कामाला लागलो आहे. पक्षाचे अध्यक्ष जो आदेश देतील तो मी पाळणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे यांनी लोकसभा निवडणूक लढविणार की नाही? याबाबत अजूनही सस्पेन्स कायम ठेवला आहे.

देश आणि राज्यात परिवर्तनाची नांदी असून परिवर्तन होणार आहे. लोकसभेचे सर्व उमेदवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निश्चित करणार आहेत, असेही लांडे यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी पक्षाची काही दिवसांपूर्वी मुंबईत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली आहे. त्यामध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून विलास लांडे यांना कामाला लागण्याचे निर्देश दिली असल्याची माहिती मिळत आहे. त्या दृष्टीने लांडे यांनी तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे.