कर्जबुडव्या विजय मल्ल्या भारतात येताच त्याला सीबीआय रिमांडमध्ये घेणार ?

vijay mallya

मुंबई- हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पळालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला कोणत्याही क्षण आता मुंबईत आणले जाणार आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषन आणि ईडीचे अधिकारी मल्ल्याला घेऊन येणार आहेत. सर्वप्रथम विमानतळावर त्याची आरोग्य तपासणी केली जाईल. त्यानंतर त्याला सीबीआयच्या कार्यालयात काही काळ ठेवले जाईल. त्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर केले जाईल.

विजय माल्ल्या मुंबईत पोहोचल्यानंतर वैद्यकीय टीम त्याच्या तब्येतीची तपासणी करेल. सीबीआय आणि ईडीचे काही अधिकारी विमानात माल्ल्यासोबत असतील. ज्यादिवशी माल्ल्या भारतात पोहोचेल, त्यादिवशी विमानतळावरून त्याला थेट कोर्टात नेलं जाईल. कोर्टामध्ये सीबीआय आणि ईडी विजय माल्ल्याची रिमांड मागतील.

ऑर्थर रोड तुरुंगात पूर्ण तयारी : 
यूके कोर्टानं ऑगस्ट २०१८ मध्ये माल्याच्या याचिकेवर सुनावणी करत भारतीय तपास यंत्रणांना त्याला ज्या तुरुंगात ठेवणार त्याची संपूर्ण माहिती मागितली होती. जिथं प्रत्यार्पणानंतर माल्याला ठेवलं जाईल. तेव्हा तपास यंत्रणांनी मुंबईत असलेल्या ऑर्थर रोड तुरुंगातील एका सेलचा व्हिडिओ यूके कोर्टाला दाखवला होता. जिथं माल्याला भारतात आणल्यानंतर ठेवलं जाईल. एजंसींनी तेव्हा यूके कोर्टाला आश्वासन दिलं होतं की, माल्याला दोन मजली ऑर्थर रोड तुरुंग परिसर आतून खूप सुरक्षित बॅरकमध्ये ठेवलं जाईल.

नेमकं काय आहे प्रकरण ?

किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्यावर देशातील १७ बँकांचे ९००० कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप माल्यावर आहे. ३ मार्च २०१६मध्ये माल्यानं भारत सोडून ब्रिटनमध्ये पलायन केलं होतं. १४ मे रोजी इंग्लंडनं माल्याचा भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला होता.

अरेरे! गरोदर हत्तीणीला खायला दिलं फटाक्यांनी भरलेलं अननस,अखेर…

‘वादळाच्या संकटकाळी प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उभं रहावं’

‘निसर्ग’चं तांडव सुरू; चक्रीवादळाची महाराष्ट्रात धमाकेदार एन्ट्री