मुळशी भागातील पाणी आपल्याकडे आणण्यासाठी प्रयत्न करणार – राहुल कुल

टीम महाराष्ट्र देशा : राजेगाव हे दौंड तालुक्‍यातील एक प्रगतशील गाव आहे. या भागातील भीमा नदीच्या पात्राची पाणीपातळी कधीही कमी झालेली नव्हती. मात्र, गेल्या वर्षी पाऊस सरासरीने कमी झाला. सध्या दरवर्षीच तालुक्‍यात पावसाचे प्रमाण कमी कमी होत असल्याने पाण्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी मुळशी भागातील पाणी आपल्याकडे आणण्यासाठी आणि येथील नदी पात्रावर बुडीत बंधारे बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार राहुल कुल यावेळी सांगितले.

राजेगाव परिसरात 15 कोटी 59 लाख रुपयांची विविध विकासकामे झाली आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, गटार योजना,सभामंडप, पेव्हिंग ब्लॉक यातील काही कामे पूर्ण झालेली आहेत, तर काही कामांचे भूमीपूजन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले. दौंड तालुक्‍याच्या पूर्व भागातील म्हणजे खानोटा येथे 5 कोटी 65 लाख, नायगाव आणि वाटलूज येथे 4 कोटी 98, मलठण 13 कोटी 46 लाख, लोणारवाडी येथे 20 लाख अशा अनेक विकासकामांचा शुभारंभ आणि काही कामांचा लोकार्पण सोहळा यावेळी आमदार कुल यांच्या हस्ते झाला. या कार्याक्रमासाठी मोठ्या संख्यने ग्रामस्थ उपस्थित होते.

Loading...

राजेगाव (ता. दौंड) येथील विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी “भीमा पाटस’चे संचालक शहाजी जाधव, मुकेश गुणवरे, “रासप’चे युवक अध्यक्ष सचिन खैरे, मालोजी मोरे, जनार्दन भोसले, भारत खराडे, प्रकाश खैरे, नवनाथ लोंढे, चंद्रकांत मोरे, महादेव बगाडे, बाळासाहेब ढमे, पोलीस पाटील महेश लोंढे, शिवाजी गुणवरे, महेश कडू, हनुमंत खरात, मनोज भोसले, एन. डी. गुनवरे,अमोल मोरे, अरुण भोई, अमोल इंदलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ