उद्या २-२ आमदारांचा, खासदारांचा प्रभाग करणार का? राज ठाकरेंचा टोला

raj vs uddhav

नाशिक : काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठाकरे सरकारनं महानगरपालिकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. तर, मुंबई महापालिकेत एक सदस्यीय वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या प्रभाग रचनवेर घणाघात केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘प्रभागांची तोडफोड करुन आपल्याला हवे तसे प्रभाग करणे योग्य नाही. लोकांनी एकाऐवजी तीन तीन बोटं का दाबायची. निवडणूक आयोगाने दखल घ्यावी,’ अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

तसेच कायदे वेगवेगळे का ? २-३-४ प्रभाग हा खेळ कसला? उद्या २-२ आमदारांचा, खासदारांचा प्रभाग करणार आहे का? ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेला प्रभाग नाही, महापालिकेला प्रभाग का? यांच्या फायद्यासाठी हे आहे का? आम्ही आमचे मार्ग अवलंबू, पण आता लोकांनी विरोध करावा, कोर्टात जावं, निवडणूक आयोगाकडे जावं, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

तसेच राज ठाकरे यांनी नागरिकांना या विरोधात कोर्टात जाण्याचे आवाहान देखील केले आहे. कुठलाही नगरसेवक काम करु देत नाही, प्रभागामध्ये कामं होत नाही. उद्या लोकांनी ठरवलं नगरसेवकाला भेटायचं आहे, तर कोणत्या नगरसेवकाला भेटायचं? यांनी निवडणुकीची थट्टा करुन टाकली आहे. गृहित धरणं सुरु आहे त्याविरोधात लोकांनी कोर्टात जावं, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या