नाव बदलल्याने शहरातील समस्या सुटणार आहेत का ?खैरेंना नागरिकांचा थेट सवाल

Chandrakant kaire

औरंगाबाद – औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजी नगर करण्याचा विसर शिवसेना मंत्र्यांनाच पडला असल्याचं वक्तव्य काल खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद येथे बोलताना केलं होतं ,महाराष्ट्र देशाने सोशल मिडीयाच्या माध्यमातून थेट  नागरिकांची मते जाणून घेतली आहेत.काहींना हे वक्तव्य म्हणजे दोन धर्मात तेढ वाढवण्यासाठी केलेलं वक्तव्य वाटत आहे तर काहींनी संभाजी महाराजांच्या हत्याऱ्याच्या नावाने एखाद शहर आपल्या राज्यात असणे म्हणजे आपल्याच तोंडावर काळिमा फासल्यासारखं वाटत आहे तर नामकरण झाल्याने शहरातील समस्या सुटणार आहेत का असा थेट सवाल वाचकांनी उपस्थित केला आहे . औरंगाबाद शहराचे नाव संभाजी नगर असावे की नसावे यावर तरुणांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत जाणून घेऊयात काय आहेत त्या प्रतिक्रिया.

नाव बदलून जर शहराचा विकास होत असेल रस्ते व स्वच्छताचे प्रश्न मार्गी लागत असेल तर नक्कीच नाव बदलण्यास हरकत नसावी.
गणेश काळे ( परतूर )

Loading...

औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे झालेच पाहिजे औरंगजेब हा परकीय राज्यकर्ता होता त्याच्या नावाने आपल्या महाराष्ट्रात शहरांची नावे असणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान होय .
गणेश कव्हळे ( अंबड )

निवडणुका तोंडावर आल्या की हिंदू धर्माची झालर अंगावर ओढून घ्यायची आणि शहराचे नाव बदला असे काहीतरी खुसपट काढायचे आणि मत मिळवायची आणि निवडणूक झाली की मुद्दा विसरून जायचं .
संदीप अवघड ( औरंगाबाद )

औरंगाबादचे संभाजीनगर करा हा केवळ दोन धर्मात तेढ निर्माण करून देण्याचा प्रयत्न आहे यामुळे यांना राजकीय पोळी भाजवता येते याचा सामान्य जनतेला काहीच फायदा नसतो .
रोशनी राठोड ( औरंगाबाद )

संभाजी महाराज हिंदू धर्मासाठी लढले नुसते लढलेच नाहीत तर त्यांनी धर्मरक्षणासाठी बलिदान दिले ज्या औरंग्याने त्यांना मारले त्यांचे तुकडे तुकडे केले त्याला आम्ही हिंदू लोक कधीच विसरणार नाहीत आणि संभाजीनगर शहराचा नाव त्या औरंग्याच्या नावाने असणे म्हणजे हिंदू धर्मावर असणारा हा एक काळा डाग आहे.
गजानन वरखडे ( औरंगाबाद )

हे फक्त थोतांड आहे यांना निवडणुका हरणार असे दिसले की हे लोक काही ही मुद्दे उकरायला लागतात संभाजी नगर नाव असावे पण त्यासाठी तुम्ही काय केलं आतापर्यंत नुसता मुद्दाच बनवलं प्रत्यक्ष कृती तुम्ही करू शकत नाहीत .
डॉ. आशिष देसरडा ( औरंगाबाद )

नामकरण झाल्याने शहरातील समस्या सुटणार आहेत का ?शहरातील लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे का ?
डॉ प्रताप जाधव ( जालना )

संभाजी महाराजांच्या हत्याऱ्याच्या नावाने एखाद शहर आपल्या राज्यात असणे म्हणजे आपल्याच तोंडावर काळिमा फसल्या सारख आहे त्यामुळे या शहराला संभाजी नगर अस नाव द्यायलाच पाहिजे.
सुनील मते ( अंबड )

गेल्या 20 वर्षापासून हा विषय आहे .. शिवसेना ही निवडणूक आल्यावर फ़क्त राजकारण करते ह्या आधी हा विषय का आला नाही ??? जनता आता हुशार झाली आहे .
गजानन पाटील ( औरंगाबाद )

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्याबद्दल उदयनराजेंच अभिनंदन:निलेश राणे
संज्या म्हणजे लुक्का;संज्या राऊत म्हणजे 'पिसाळलेला कुत्रा':निलेश राणे
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
'अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते  कामाला वाघ आहेत'
नितेश राणेंची जीभ घसरली संजय राऊतांवर केली अश्लाघ्य भाषेत टीका
'हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही, आज सातारा बंद