जाणून घ्या पुद्देचेरीमध्ये नवे सरकार स्थापन होणार कि निवडणुका लागणार ?

a.anabalagan

पुद्देचेरी – पुद्देचेरी विधानसभेचा कार्यकाळ २१ जून २०२१ रोजी संपणार आहे. पण कार्यकाळ संपण्यासाठी जेमतेम चार महिने उरले असताना पुद्देचेरीत अस्थिरता निर्माण झाली. मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले आणि काँग्रेसचे सरकार पडले.

पुद्देचेरीमध्ये सोमवारी कॉंग्रेसचे सरकार कोसळले आणि 6 आमदारांच्या राजीनाम्यामुळे ते पडले. सभागृहात सध्या कॉंग्रेसचे 11 आमदार आणि विरोधी पक्षांचे 14 आमदार आहेत. त्याचवेळी विरोधी पक्ष एआयएडीएमकेचे सदस्य ए. अनबालगन यांनी म्हटले आहे की याक्षणी आमचे सरकार स्थापन करण्याचा कोणताही हेतू नाही. निवडणुकीच्या तारखा 10 दिवसांत जाहीर केल्या जातील. आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ आणि लोकशाही मार्गाने सरकार स्थापन करू.

सत्ताधारी आघाडीच्या एकूण सहा आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर नारायणसामी यांचे सरकार अल्पमतात आले होते. सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्यासाठी विरोधकांनी उपराज्यपाल यांना अर्ज दिला होता. सोमवारी विश्वासदर्शक ठरावावर मतदान करण्यापूर्वी सत्ताधारी कॉंग्रेस-द्रमुकचे आमदार विधानसभेबाहेर गेले. विधानसभेत बहुमत सिद्द न झाल्याने काँग्रेसचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी आपला राजीनामा नायब राज्यपालांकडे पाठवला आणि आता ते पायउतार झाले आहेत.

दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांना आपला राग अनावर झाला. बहुमत ठराव मांडण्याआधी नारायणसामी यांनी, ‘पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका केली आहे .

दरम्यान,पुदुचेरीत काँग्रेसचे सरकार कोसळले असले तरी एप्रिल-मे महिन्यात याठिकाणी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, या निवडणुकांमध्ये पुन्हा सत्तेत येणे काँग्रेससाठी अवघड बाब मानली जात आहे.दरम्यान, अनबालगन यांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे आता त्याठिकाणी नवे सरकार येणार नाही हे जवळपास नक्की झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या