वीज बिलात सूट मिळणार?

Mahavitran

मुंबई : कोरोना महामारीने गेले ४ महिने थैमान घातले आहे. तर, मार्चपासून या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोना रोगाची गंभीरता बघता, महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देखील घरोघरी जाऊन मीटर रिडींग घेणे शक्य नव्हते. त्यामुळे, या कालावधीतील बिलं हि सरासरीवर देण्यात आले होते, तसेच वीज बिल भरण्यास अतिरिक्त कालावधी देखील देण्यात आला होता.

यानंतर, जून, जुलैमध्ये राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर मीटर रिडींग घेण्यात आले व त्यानुसार बिले देण्यात आली. मात्र, हजारो ग्राहकांना अव्वाच्या-सव्वा बिले देण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या असून घरे वा दुकाने बंद करून गावी गेल्याचे देखील वाढीव वीज बिल आल्याने ग्राहकांना मोठा झटका बसला होता. काही जणांना चुकीची बिलं पाठवल्याने मोठ्या प्रमाणात लोकांकडून असंतोष व्यक्त होत होता.

कोटींची पारितोषकं देणारे राजकारणी यावर्षी ‘ती’ रक्कम गोविंदा मंडळांना का वाटत नाहीत?

सुधारित बिलं पाठवण्याची मागणी होत होती. महावितरण कार्यालयाच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. भाजप आणि मनसेने वीज बिलात सूट देण्याची मागणी सरकारकडे केली होती. तर, काल मनसेने आक्रमक पवित्रा घेत महावितरणच्या कार्यालयात ‘खळ्ळ-खट्याक’ करत प्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

Alert: पुण्यातील खडकवासला धरणातून विसर्ग सुरु!

यानंतर, आता आज मंत्रिमंडळ बैठकीत वीज बिलात सूट देण्यासाठीचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे. युनिटच्या वापरानुसार वीज बिलात सवलत देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. १० ते ३० टक्क्यांपर्यंत वीज बिलात सवलत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऊर्जा विभाग आज मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. राज्यात एकूण 73 लाख घरगुती वीज ग्राहक आहेत. वीज बिलात सूट दिली गेली तर वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात झी २४ तासने वृत्त दिले आहे.

‘उद्धव ठाकरे तुम्ही आणि तुमच्या मुलाने राजीनामा द्यावा’

दरम्यान, गणेशोत्सव काळात कोकणात वीज कपात गेली जाणार नसून अखंडीत वीज पुरवठा आता केला जाणार आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणात २४ तास वीज पुरवठा केला जाईल. यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी याबाबत महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत.