एसटी संपावर आज निघणार तोडगा? औरंगाबादेत एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे सत्र सुरूच

एसटी संपावर आज निघणार तोडगा? औरंगाबादेत एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे सत्र सुरूच

st

औरंगाबाद : गेल्या ३ आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मात्र अजूनपर्यंत तोडगा काढण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या मुख्य मागणीबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती आज आपला अहवाल देणार आहे. तसेच तो निर्णय येईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची तयारी राज्य सरकारने करत आहे. औरंगाबाद विभागातील १६ रोजंदारी कर्मचाऱ्याची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. तर ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबनामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

एसटी संपाचा थेट परिणाम सर्वसामान्यांचा दररोजच्या जीवनावर झाला आहे. एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करत खासगी वाहनांमधून दाटीवाटीने प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने खासगी वाहने उपलब्ध करून दिली असली तरी त्यांच्यावर कोणाचाही थेट अंकुश नसल्याने ज्यादा दर आकारले जात आहेत. तसेच कोरोनाच्या परिस्थितीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी या वाहनांमध्ये आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर संप असाच लांबत राहिला तर एसटी कर्मचारी अशा दोघांचे नुकसान होईल, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दोन पावले मागे संप मागे घ्यावा, असे आवाहन अनिल परब यांनी केले.

या प्रस्तावावर कर्मचारी आणि संघटना विचार करतील. एसटी महामंडळातील संपकरी कर्मचाऱ्यांवर महामंडळाकडून कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी (दि. २३) औरंगाबाद विभागातील १६ रोजंदारी कर्मचाऱ्याची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. तर ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. आजपर्यत २४ कर्मचाऱ्याची सेवा समाप्ती तर ७२ जणांचे निलंबन करण्यात आले आहे. काल झालेल्या निलंबनात मध्यवर्ती बस स्थानकातील ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या