Exit Poll : शिवसेना पहिल्यांदाचं मारणार शतक, तब्बल 102 जागांवर मिळवणार विजय ?

udhav

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. राज्यभरात आज एका टप्यात मतदान पार पाडले. काही ठिकाणी पावसाचे सावट असल्याने मतदानाचा टक्का काहीसा घसरताना दिसला. तर शहरी भागा पेक्षा ग्रामीण भागात मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. येत्या 24 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारराजाने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे. हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

तत्पूर्वी काही एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिवेसेनेला बहुमत मिळत असल्याच सांगण्यात येत आहे. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. news 18 लोकमतच्या अंदाजानुसार शिवसेना यावेळेस शतक मारणार असल्याचं दिसत आहे. शिवसेनेला तब्बल 102 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच शिवसेनेच्या आमदारांची संख्या 39 नं वाढेलं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या विधानसभा निवडणुकीला भाजप – शिवसेना युती करून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे जागावाटपात शिवसेना 124 जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे 124 पैकी 102 जागांवर शिवसेना बाजी मारणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.इतिहासात शिवसेनेला कधीही इतके घवघवीत यश मिळाले नव्हते. त्यामुळे शिवसेना इतिहास रचणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

NEWS18 लोकमतच्या एक्झिट पोलनुसार भाजपला – 141 , शिवसेनेला – 102 , राष्ट्रवादी कॉंग्रेस – 22 , कॉंग्रेस – 17 एवढ्या जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महायुतीला तब्बल 243 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर महाआघाडीचा सुपडासाफ होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या