मराठा क्रांती मोर्चा :मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळेल का ? : चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : काही पेड लोकं आंदोलनात घुसले असून आंदोलन करून गाड्या फोडून काय साध्य होणार आहे? असा सवाल महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय हा आता न्यायालयाच्या हातात आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळेल का ? असा देखील सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

नेमके काय म्हणाले चंद्रकांत पाटील

काही पेड लोक आंदोलानात घुसली आहेत, त्यांना हे आंदोलन बदनाम करायचे आहे. निवडणूक काळात हे प्रकार वाढणार आहेत. पण आंदोलकांनी या पेड लोकांना खड्यासारखे बाजूला करावे. आज पंढरपूरमध्ये 7 लाख वारकरी अडकून आहेत. 10 लाख काय 10 कोटी देऊन काकासाहेब शिंदेच्या कुटुंबाची भरपाई करता येणार नाही. जे आपल्या हातात नाही त्यासाठी आंदोलन करुन उपयोग होणार नाही, मंत्र्याच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा. बसेस फोडून आरक्षण मिळणार आहे काय?

मराठा क्रांती मोर्चा : शिवसेना खासदाराला आंदोलकांची मारहाण

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना औरंगाबादमधील एका युवकाने घेतलेल्या जलसमाधीनंतर मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला आणखी एका युवकाने नदीपात्रात उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंदोलनादरम्यान कोरड्या नदीत उडी मारल्याने हा युवक जखमी झाला आहे. कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील हा युवक असल्याचं समजतंय. ग्रामीण रुग्णालयात या युवकावर उपचार सुरु आहेत.

काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत, भावाला मिळणार नौकरी

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.