मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२८ एप्रिल) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राज्यातील चालू घडामोडींवर भाष्य केले. तसेच आपण ज्यांना पुरस्कृत करतो, ते आपल्यासोबतच राहतील का? हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही, असेही अजित पवार म्हणाले.
यावेळी बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,‘नवनीत राणा या २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांचे पती रवी राणा हे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होते. २०१९ ला पुन्हा रवी राणा आणि नवनीत राणा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार होते. आपण ज्यांना पुरस्कृत करतो, ते आपल्यासोबतच राहतील का? हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र सरकार येईल असे कुणालाच वाटले नव्हते. एके काळी ममता बॅनर्जी आणि भाजप एकत्र होते, आज ममतादीदी भाजपच्या विरोधक आहेत.’
नवनीत राणा या २०१४च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांचे पती रवी राणा हे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होते. २०१९ ला पुन्हा रवी राणा आणि नवनीत राणा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार होते. @AjitPawarSpeaks pic.twitter.com/xIdCWWaogS
— NCP (@NCPspeaks) April 28, 2022
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘बिहारमध्ये नितीश कुमार कधी भाजप सोबत असतात कधी भाजपचे विरोधक होतात. त्यामुळे अशा घटना आपल्या इथेच नाही, तर भारतभर घडत असतात,’ अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “शरद पवारांनी स्वत:च्याच एकमेव संघटनेला मान्यताप्राप्त करून दिली”- गोपीचंद पडळकर
- ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर विखे पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- IPL 2022 : विराट कोहलीचा ‘O Antava’ गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO घालतोय सोशल मीडियावर थैमान!
- चोरट्यांनी थेट खासदारांच्या बंगल्यात केली घरफोडी; पोलिस यंत्रणाही हादरली
- “पुण्यात तलवारींचा साठा सापडला, गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा का ?” ; शेलारांचा सवाल