बालेकिल्ल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा वर्चस्व मिळवणार का ?

ncp hallabol

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हल्लाबोल सभेच्या माध्यमातून आज पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. निम्मित्त आहे ते हल्लाबोल आंदोलनाच्या सांगतेचे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाचे. मात्र पक्षाचा वर्धापन दिन कितवा हेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना माहित नाही. तसेच पश्चिम महाराष्ट्र राष्टवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होता. मात्र भाजपने या किल्ल्यावर वर्चस्व मिळवले. हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार वातावरण निर्मिती केली असून बालेकिल्ल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा वर्चस्व मिळवणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आज पुण्यात तुफान पोस्टरबाजी करण्यात आली. तसेच ट्विटर वर राष्टवादीच्या नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ट्विटर वर अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या १९व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर पक्षाच्या अधिकृत ‘ncp speack’ या अकाऊंटवरून २०व्या वर्धापण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टरवर कुठे १९वा वर्धापन दिन आहे तर कुठे २०वा. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हा नेमका कितवा वर्धापन दिन ? अशी शंका राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्य पिंजून काढले. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. नुकतेच जामिनावर सुटलेले माजी उप-मुख्यमंत्री छगन भुजबळ या सभेला उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापनदिनाचे औचित्य या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने विदर्भ, मराठवाडा त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलन केले. या आंदोलनाची सांगता देखील आजच्या सभेत होणार आहे. दरम्यान, उद्याची सभा माझ्यासाठी ट्रायल आहे. त्यानंतर राज्यात भेटी देणार असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. उद्याच्या सभेला अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत.