न्युझीलंडला जे जमलं नाही ते भारतीय संघ करणार का?

मुंबई : भारतीय संघ तीन महिन्याच्या दौऱ्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.

यादरम्यान इंग्लंड आणि न्युझीलंड संघादरम्यान दोन कसोटी सामन्याची मालिका सुरु आहे. यातील लॉर्ड्स येथील पहिला सामना इंग्लंडचा संघ अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरला होता. यासह मागील तीन वर्षापासुन लॉर्ड्सवर अपराजित राहण्याचा विक्रम इंग्लंडने कायम राखला. २०१८ साली पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पराभवानंतर इंग्लंडच्या संघाने लॉर्ड्सवर एकही सामना गमावला नाहीये. नुकत्याच न्युझीलंडविरुद्धच्या सामन्यातही इंग्लंडच्या संघाने पराभव टाळत सामना अनिर्णीत राखला होता. मात्र आता आगामी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या मालिकेत भारतीय संघाकडे ही संधी चालुन आली आहे.

या मैदानावर भारतीय संघाने अखेरचा कसोटी विजय २०१४ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवला होता. त्या सामन्यात अजिंक्य रहाणेनी शानदार शतक झळकावले होते. तर गोलंदाजीत ईशांत शर्माने भेदक गोलंदाजी केली होती. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३ चा क्रिकेट विश्वचषक आणि सौरव गांगुलीच्या नेतृत्वात २००२ नेटवेस्ट ट्रॉफी भारतीय संघाने याच मैदानावर जिकंलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP