शेतकरी आंदोलन पेटणार?; राकेश टिकैत घेणार ममता बॅनर्जींची भेट

mamta vs rakesh

दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचा संघर्ष अजून देखील सुरु आहे. गेले अनेक महिने उलटून देखील आंदोलक शेतकरी हे दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. भारतीय किसान युनियनचे नेते आणि प्रवक्ते राकेश टिकैत या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आंदोलन प्रभावित झाले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून, आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी राकेश टिकैत यांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. यापूर्वीच ममता बॅनर्जी यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.

राकेश टिकैत आणि ममता बॅनर्जी यांची भेटीमुळे एक वेगळेच राजकीय समीकरण तयार होऊ शकते, अशी चर्चा आहे. ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीपासूनच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत राकेश टिकैत यांनी प्रचारात सहभाग नोंदवला होता. तसेच भाजपविरोधी मतदान करण्याचे आग्रही आवाहन केले होते. इतकेच नव्हे, तर मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा दावाही केला होता.

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सप्टेंबर महिन्यात पंजाब आणि हरियाणात सुरू झालं. पण आपलं म्हणणं दिल्लीत बसलेल्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचत नसल्याचं लक्षात आल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केलं. गेल्या सहा महिन्यात दिल्लीच्या सीमेवर टाकलेले तंबू आणि ट्रॉली हेच शेतकऱ्यांचं घर झालं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं आंदोलन आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP