दोन राजेंमध्ये तह, शिवेंद्रराजे फक्त आमदारकी लढवणार

सातारा : शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद जगजाहीर आहे. मात्र या दोघातील वाद अखेर आता मिटण्याची दिसू लागली आहेत. मला फक्त आमदारकीत रस आहे. त्यामुळे मी विधानसभेची तयारी करत आहे, असं आमदार शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे. आमची दोन घराणी नाहीत, छत्रपतींचं घराण एकच आहे, असं म्हणत त्यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासोबतचा वाद मिटवण्याचे संकेत दिले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

नेमकं काय म्हणाले आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले ?
माझी निष्ठा शरद पवारांवर आहे. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायल्या मिळाल्या आहेत. त्यांचा सहवास आधी मिळाला असता, तर बरंच काही शिकता आलं असतं असं वाटतं. मला आमदारकीत रस आहे. त्यामुळे मी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारीला लागलो आहे. छत्रपतींचं घराणं एकच आहे. त्या घराण्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, अशी कोणतीही कृती माझ्याकडून घडणार नाही.