सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवला म्हणून तरी संजय राठोड यांच्यावर मुख्यमंत्री गुन्हा दाखल करतील का’

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर मंत्री संजय राठोड जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपासंदर्भाने खुलासा व्हावा म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी पोहरादेवी याठिकाणी डेरेदाखल आहेत.

संजय राठोड सहपरिवार पोहरादेवीत येतील. ते संत सेवालाल महाराजांचं दर्शन घेतील, संत रामराव बापू आश्रमाला भेट देतील, धर्मपीठावर जाऊन भक्तीधामला भेट देऊन निघून जातील. राठोड माध्यमांशी बोलणार की नाही याबद्दल काही सांगण्यात आलेलं नाही.

राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठिशी शिवसेना पक्षही उभा असल्याचे चित्र आता समोर येत आहे. कारण, पोहरादेवीला जाण्यासाठी निघालेल्या संजय राठोड यांच्या घरी सकाळपासून शिवसेनेचा एकएक नेता दाखल होताना दिसत होता.

पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली असून कोरोनाच्या सगळ्या नियमांना पायदळी तुडवल आहे. अक्षरशः सोशल डिस्टंसिंगचा कोथळा बाहेर काढण्यात आला आहे. राज्यात कोरोना संक्रमण वाढत असतानाही चक्क मंत्री सर्व नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत.

यावरून भाजप आक्रमक झालेले आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरूनच संजय राठोड यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. ‘युवतीच्या मृत्यूप्रकरणात नाव असलेले मंत्री १५ दिवस गायब होतात. मुख्यमंत्री गप्प. मात्र उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला हरताळ फासत हे मंत्री सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत शक्ती प्रदर्शन करतात’, असं म्हणत सत्तेची अपरिहार्यता असू शकेल, मुख्यमंत्री किमान कोरानाचे नियम मोडल्याचा गुन्हा दाखल करणार का ?’, असा सवालही उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या