‘मुख्यमंत्री कारवाई करणार की घरातच बसून फेसबूक लाईव्ह करणार आहेत?’

मुंबई : पुणे मुंबई पाठोपाठ आता ठाणे जिल्हाही बलात्काराच्या घटनेने हदरला आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आहे. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. ‘पुणे, मुंबई नंतर आता उल्हासनगर… महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय? राज्याला गृहमंत्री आहेत की नाही? मुख्यमंत्री काही कारवाई करणार आहेत की फक्त घरातच बसून फेसबुक लाईव्ह करणार आहेत?’ असे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे.

उल्हासनगर स्थानकास लागून असलेल्या स्कायवॉकवर १४ वर्षाची मुलगी उभी असताना एक तरुण तिच्या जवळ आला. तो तिला जबरदस्ती एका निर्जन स्थळी घेऊन गेला. त्या ठिकाणी मुलीला बेदम मारहाण केली. नंतर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपी मुलीला घटनास्थळी सोडून पळून गेला.

संबंधित घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मीक शादरुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला. पोलिसांनी या प्रकरणी नराधम आरोपी दादा उर्फ श्रीकांत गायकवाड याला अटक केली आहे. त्याने गुन्हा कबूल केला आहे. तसेच या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या