शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू केंद्र सरकार पुसणार आहे का? आ. धीरज देशमुखांचा सवाल

शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू केंद्र सरकार पुसणार आहे का? आ. धीरज देशमुखांचा सवाल

Dhiraj Deshmukh

लातूर : देशात सोयाबीनला चांगला भाव मिळत असतांना केंद्र सरकारच्या वतीने सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोयाबीनचे भाव कमी झाले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता या मुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू केंद्र सरकार पुसणार आहे का? असा प्रश्न लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केलेली आहे. त्यात सोयाबीनला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याताच जो काही सोयाबीन हातात येण्याची अपेक्षा आहे, त्याचेही भाव निम्म्याने कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या संदर्भात आमदार धीरज देशमुख म्हणाले की, ‘खाद्यतेल आयात शुल्कात घट आणि परदेशातून सोयापेंड आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे सोयाबीनचा भाव चक्क साडेपाच हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू केंद्र सरकार पुसणार आहे का?’

महत्त्वाच्या बातम्या