सर्वसामन्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे प्रशासन कोरोनाचे नियम मोडणाऱ्या राठोड यांच्यावर कारवाई करणार ?

sanjay rathod

यवतमाळ- राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड वाशिममधील पोहरादेवी गडावर पोहोचले आहेत.जवळपास 15 दिवसांनी ते समोर आले. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर नॉट रिचेबल असणारे संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे चिंता व्यक्त होतेय. याच पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लाईव्ह येत नागरिकांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी मास्क, सतत हात धुणे आणि शारीरिक अंतर राखणे यासह कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे असे असूनही पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली असून कोरोनाच्या सगळ्या नियमांना पायदळी तुडवले गेले आहेत.

बेकाबू गर्दीवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली.पोलिसांचे आदेश झुगारत ५० जणांची परवानगी असताना शेकडो समर्थकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. शिवसेनेचे कार्यकर्ते नेते हेच या गर्दीत मोठ्याप्रमाणावर दिसून येत आहेत.

यवतमाळमधून सकाळी ९ च्या सुमारात संजय राठोड हे पोहरादेवी गडावर येण्यासाठी निघाले, यावेळी त्यांच्यासोबत ८-१० गाड्यांचा ताफा होता, त्यानंतर दिग्रस शहरात पोहचताच ढोलताशांच्या गजरात संजय राठोड यांचे स्वागत करण्यात आले, येथे शासकीय विश्रामगृहात काही वेळ थांबून संजय राठोड हे पोहरादेवी गडाकडे रवाना झाले, तेव्हा दिग्रस ते पोहरादेवी गडापर्यंत त्यांच्यासोबत २०-२५ गाड्यांचा ताफा होता.

दरम्यान,गेल्या अनेक दिवसांपासून भारतासह राज्यभरात कोरोनाचा प्रसार वेगानं होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल का? अशी भिती अनेकांना वाटत आहे. सर्वसामान्य नागरिकांना नियम मोडल्यावर कारवाई करणारे प्रशासन आता या बड्या मंत्र्यावर आणि महंत यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या