आज तरी जाधाववाडी कडे प्रशासनाचे लक्ष जाणार का ?

औरंगाबाद : शहरात कोरोनाच्या संकटाने पुन्हा एकदा डोक वर काढले आहे. काही वृत्तवाहिन्यांनी तर शहरात सोमवार पासून लॉकडाऊन लागणार अश्या बातम्या देखील केल्या. यावर प्रशासन आज बैठक घेणार आहे. मात्र, लोकांची सततची झुंबड असलेल्या जाधववाडीकडे आज होणाऱ्या संयुक्त बैठकीत प्रशासनाचे लक्ष जाणार का? असा सवाल नागरिक करत आहे.

शहरात लॉकडाऊन होणार या चर्चेने शनिवारी चांगलाच जोर धरला होता. यासाठी प्रशासनाला पुढे याव लागल होत, जिल्हाधिकारी रविवारी रुजू होत संयुक्त बैठक घेणार असे फर्मान त्यांनी काढले होते. परंतु शहरातील रुग्णांची संख्या हाता बाहेर जात असल्याने लॉकडाऊन लागण्याची शक्यता अनेक अधिकाऱ्यांनी खाजगी मध्ये बोलून दाखवली. मात्र, गर्दी होत असलेल्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जाधववाडी हे जिल्ह्यातील मोठे अडत मार्केट आहे. पहाटे पासूनच येथे भाजीपाला खरेदी-विक्रीला सुरुवात होते. त्यामुळे येथे पाहते पासूनच गर्दी असते. त्यात लॉकडाऊन होणार या भीतीने तर दररोज गर्दीत वाढ होत आहे. प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्याप येथे कोणत्याच ठोस उपाययोजना केल्या नसल्याचे व्यापारी तसेच नागरिक सांगत आहे. या विषयी आधी सुद्धा बातम्या प्रकाशित करण्यात आल्या परंतु त्याचा कोणताच परिणाम प्रशासनावर झाला नाही.

जाधववाडीतील गर्दी संदर्भात प्रशासनाने कडक कारवाई करावी. आज होणाऱ्या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेत असताना जाधववाडीतील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी देखील ठोस उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गर्दीच्या ठिकाणी कडक शासन राबविल्यास लॉकडाऊन करण्याची गरज पडणार नसल्याचीही मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या