2000 रुपयांची नोट बंद होणार आहे का?

Rs-2000 note

टीम महाराष्ट्र देशा :  नोटबंदी लागू करण्यात आल्यानंतर 2000 रुपयांची नोट चलनात आली. त्यानंतर ही नोट बंद करण्याच्या विचारात मोदी सरकार असल्याचे बोलले जात होते. याबाबत लोकसभेत चर्चा करण्यात आली होती. वित्त राज्यमंत्री पी राधाकृष्णन यांनी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, 2000 रुपयांची नोट बंद करणार नाही. देशात 5 शहरांत 10 रुपयांची प्लास्टिक नोट आणण्याचा प्रस्ताव आहे. 10 रुपयांची प्लास्टिक नोट लवकरच चलनात येईल असे त्यांनी सांगितले.

अर्थ मंत्रालय भविष्यात 2000 रुपयांची नोट बंद करण्याची योजना आखत आहे का? असा प्रश्न सरकारला विचारण्यात आला होता. त्यावर  राधाकृष्णन यांनी लोकसभेत स्पष्ट केले की 2000 रुपयांची नोट बंद करणार नाही. 500 आणि 2000 रुपयांच्या नोटेमध्ये 10 एमएमचे अंतर ठेवण्यात आलेय. त्यामुळे दोन्ही नोटा लगेच ओळखता येऊ शकतात.Loading…
Loading...