मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा पुणे व गेली कित्येक टर्म भाजपचा दबदबा असलेला नागपूर मतदारसंघ देखील यंदा महाविकास आघाडीने स्वतःच्या ताब्यात घेतला आहे.
त्यामुळे एकीच्या बळाचा अनुभव आल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पुढील येणाऱ्या निवडणुका देखील एकत्रपणे लढवल्या जातील असा खुलासा केला होता. मात्र, आता स्थानिक पातळीवर होणाऱ्या मागणीमुळे महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
पदवीधर, शिक्षक निवडणुकांनंतर आता स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांचे बिगुल वाजू लागले आहेत. कोरोना काळामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायती निवडणुकांसोबतच अनेक शहरातील महापालिनच्या निवडणूक आता जवळ येत आहेत. दरम्यान, औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची आज मुंबईच्या गांधी भवनात काँग्रेसचे जिल्हा संपर्क प्रमुख व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी बैठक घेतली.
या बैठकीत स्वबळ आणि आघाडी करून लढण्याची मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केली. सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर अमित देशमुख यांनी ‘स्बबळाची तयारी करा, सगळ्या ११५ वार्डात उमेदवार देता येतील, या पद्धतीने काम करा, पुढचं पुढे बघू,’ असं विधान केल्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षाला आपलं बळ वाढवायचं असतं, त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीमध्ये स्थानिक पातळीवर तणाव वाढणार हे मात्र स्पष्ट आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाॅर्ड रचना आणि आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असल्यामुळे त्या निकालानंतरच निवडणुकीचा निश्चित कार्यक्रम जाहीर होईल. मात्र राजकीय पक्षांनी आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध कामांच्या उदघाट्नासाठी औरंगाबादचा दौरा केला होता.
महत्वाच्या बातम्या
- कंगनाच ट्विटर अकाऊंट बंद करण्यासाठी थेट उच्च न्यायालयात याचिका, तर राज्य सरकारचा विरोध
- जयंत पाटील म्हणतात…शिवसेनेच्या पराभवाची येत्या काळात भरपाई करणार!
- रयतच्या बड्या अधिकाऱ्याचा पुण्यात राजीनामा; परिस्थिती हाताळण्यासाठी शरद पवार थेट साताऱ्यात
- भामा-आसखेडचं पाणी भाजपात अंतर्गत संघर्ष पेटवणार ?, अनिल टिंगरेंचा आंदोलनाचा इशारा
- केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत कृषी कायद्यांच्या प्रतिचे केले तुकडे-तुकडे