मुंबई: केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्याने मारहाण केल्यामुळे राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही पक्षातील महिलेवर हात उगारला, तर स्वतः तिथे जाऊन हात तोडून हातात देईन’, असा इशारा दिला हता. यावरूनच आता भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी थेट महाविकास आघाडी सरकारला सवाल केला आहे.
“कानफाटात मारावीशी वाटली होती” या वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करणारे मर्दांचे महा विकास आघाडी सरकार आता “हात तोडण्याची” भाषा करणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळेंवर तशीच कारवाई करणार ना? अहो बेस्ट मुख्यमंत्री, जनतेला दिसू तर द्या तुमची मर्दानगी. असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.
नेमके प्रकरण काय?
पुण्यात बालगंधर्वमध्ये स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरूनच राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत भाजपवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ११ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ प्रकरणासंदर्भात CBI ने घेतली पी. चिदंबरम यांची झडती
- “कोणी कितीही आकडे मोड करावी मात्र…”, संजय राऊतांचा इशारा
- IPL 2022 MI vs SRH : हैदराबाद झिंदाबाद..! चित्तथरारक लढतीत मुंबईचा पराभव; टिम डेव्हिडची स्फोटक खेळी व्यर्थ!
- IPL 2022 MI vs SRH : हैदराबादचं मुंबईला १९४ धावांचं आव्हान; त्रिपाठी, गर्गची सुंदर खेळी!
- “राजमुद्रेची विटंबना थांबवा,” ; संभाजी ब्रिगेडचं मनसेला आवाहन