सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा वाद विसरून येणार एकत्र?

कपिल शर्मा

मुंबई : ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. यातील कलाकारांनी देखील लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. यांनी अविरतपणे लोकांना हसविण्याचे काम केले. मात्र या कार्यक्रमाची अनेकदा विविध कारणामुळे चर्चा झाली आहे. काही वर्षांपूर्वी सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर सुनील या कार्यक्रमातून बाहेर पडला.

सुनील ग्रोव्हरने एका रेडिओला दिलेल्या मुलाखतीत तो कपिलसोबत पुन्हा एकदा काम करणार का? असे विचारले असता त्यावर सुनीलने उत्तर दिले की, ‘सध्या तरी कपिलसोबत काम करण्याचा माझा कोणताही विचार नाही. परंतु जर संधी मिळाली तर आम्ही दोघे नक्की एकमेकांबरोबर काम करू…’ कपिल आणि सुनील यांच्यामध्ये २०१७ मध्ये वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यात अनेक दिवस संवाद नव्हता.

सुनीलने आता सिनेमांमध्ये पदार्पण केले आहे. काही दिवसांपूर्वी कपिलच्या वाढदिवशी सुनीलने त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सुनीलच्या शुभेच्छांवर कपीलने देखील प्रतिक्रिया देत त्याचे आभार मानले होते. सुनील ग्रोवर ‘सनफ्लॉवर’ या सीरिजमध्ये दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP