‘एकबार जो मैंने कमिटमेंट दी, तो उपरवाला और निचेवाला भी अपनी सुनता है’

सातारा : सातारा पालिकेच्यावतीने कास परिसरात अनेक उपक्रम आगामी काळात राबविले जाणार आहेत. कास धरणाला महसूलसह इतर विभागांची परवानगी मिळाली आहे. पण युनेस्कोची परवानगी मिळविणे इतके सोपे नव्हते. यासाठी आम्ही पाठपुरावा कलो. त्यामुळे या धरणाच्या कामाला युनेस्कोनेही परवानगी दिली आहे, आहे, असे सांगून उदयनराजेंनी एकदा मी कमिटमेंट दिली तर ती मी पूर्ण करतो. एकबार जो मैंने कमिटमेंट दी, तो उपरवाला और निचेवालाही अपनी सुनता है….अशी डायलॉगबाजी त्यांनी केली.

दरम्यान, कास धरणाची निर्मिती श्री. छ.प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी केली. कास धरणाची उंची वाढवल्यामुळे सातारा शहरात तसेच परिसरातील गावांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही. कास धरणाच्या माध्यमातून स्ट्रीट लाईटसाठी वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय या धरणात बोटिंगसारखा उपक्रमही सुरु करणार असल्याचे आश्वासन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिले.