मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा ‘पुष्पा’ या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. दरम्यान चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेला प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. पण सध्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल सोशल मीडियावर भलतीच चर्चा चालू आहे. या दुसऱ्या भागामध्ये श्रीवल्लीचा मृत्यू होणार असं बोललं जात आहे. ज्यावर आता निर्मात्यांनी सत्य माहिती सांगितली आहे.
चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण दुसऱ्या भागामध्ये श्रीवल्लीचा मृत्यू होणार असल्याची चर्चा चालू आहे. यावर निर्माता वाय रवी शंकर (Ravi Shankar)यांनी एका मुलाखतीमध्ये याची सत्य माहिती सांगितली आहे. ते म्हणाले, “या सर्व फक्त अफवा आहेत. आम्ही अजून दुसऱ्या भागाची कथा व्यवस्थितपणे ऐकलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या भागामध्ये असं काही होणार नाही. जर चित्रपटाबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही तर मग अशाप्रकारे काहीही बोलणे चुकीचे आहे.”
माहितीनुसार, ‘RRR’ आणि ‘KGF: Chapter 2’ सारख्या दक्षिण भारतीय चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर, चित्रपटात मास एलिमेंट ठेवण्याचा दबाव सुकुमार वर खूप वाढला आहे, जेणेकरून हा चित्रपट दक्षिण आणि उत्तर भारतीय या दोन्ही प्रेक्षकांना आवडेल. अल्लू अर्जुनचे चाहते अजूनही चित्रपटाबद्दल जास्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :