fbpx

लवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक सत्ताधाऱ्यांना चीतपट करण्यासाठी रणनीती आखत आहेत तर सत्ताधारी जनतेला आश्वासनांची गाजर दाखवत आहेत. असच अजून एक गाजर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दाखवल आहे. येत्या ५ मार्च पर्यंत राज्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल अस नव आश्वासन तावडे यांनी दिल. ते लातूर मध्ये असताना एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

तावडे म्हणाले की, येत्या 5 मार्चपर्यंत राज्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असून ही भरती पुढे देखील तशीच होत राहील.तसेच जर संस्था चालकांना भरती प्रक्रियेवर आक्षेप असेल तर संस्था चालकांची भरती बाजूला ठेवून, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषदेतील शिक्षकांची भरती केली जाईल.

याआधी देखील विनोद तावडेंनी आगामी सहा महिन्यात राज्यात शिक्षकांच्या 24 हजार जागा भरल्या जाणार आहेत, असे आश्वासन फेब्रुवारी 2018 मध्ये दिले होते. मात्र ते आश्वासन गाजरचं ठरले आहे. ते आश्वासन तर पूर्ण झाले नाही पण आता विनोद तावडे यांनी अजून एक गाजर जनतेसमोर ठेवले आहे.

2 Comments

Click here to post a comment