fbpx

शिवस्मारक होणार का? उत्तर आलं अभ्यास सुरु आहे !

shivsmarak

मुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या बांधकामावरून राष्ट्रवादीने ट्विट करून जनतेचा कौल घेतला आहे. या कौल मध्ये त्यामध्ये ४३ टक्के लोक म्हणत आहेत की, अभ्यास सुरु आहे. त्यामुळे शिवस्मारक होणार का? तर उत्तर आले अभ्यास सुरु आहे, अशीच परिस्थिती या कौलामधून दिसून येत आहे.

 

 

“अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं तीनवेळा भूमिपूजन झालं. एक वीटही रचली गेली नाही. तरीही सुप्रीम कोर्टाने हे न सुरू झालेले काम थांबवण्याचे आदेश दिले. राज्य सरकारच्या या नामुष्की मागची कारणं” अशा प्रकारचे ट्विट राष्ट्रवादीने केले होते. त्यामध्ये करणे दिली होती. ४३ टक्के लोक म्हणत आहेत की, अभ्यास सुरु आहे . तर ४१ टक्के लोकांनी वेळकाढूपणा , १६ टक्के लोकांनी उंची कमी करणयाच्या बाजूने कौल दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर पेजवर हा कौल पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण ५६४ जणानी त्यांचा कौल दिला आहे.