मतदार यादीत गोंधळ करून शिवसेना निवडणूक जिंकणार का ? – नितेश राणे

Nitesh rane vs Uddhav thackeray

मुंबईः विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीमुळे शिवसेना आणि नारायण राणे आमने-सामने आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकरांना टोले लगावले आहेत.

नारायण राणे आणि मिलींद नार्वेकर यांच्यातील वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. शिवसेना सोडतांना राणे यांनी नार्वेकर यांना टार्गेट केले होते. नितेश राणे यांनी . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकरांना लक्ष्य करत त्यांनी मतदार यादीतील गोंधळाकडे लक्ष वेधलं आहे.

नितेश राणे यांनी मालाड विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीत मिलिंद नार्वेकर यांच्या पत्नीचं सहा वेळा नाव असल्याचा दावा केला. तशे फोटो देखील त्यांनी ट्विटर वर पोस्ट केले आहेत. मीरा मिलिंद नार्वेकर हे नाव सहा वेळा दिसतंय. त्यावर बोट ठेवत, शिवसेना पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अशी जिंकणार का?, असा खोचक प्रश्न नितेश राणेंनी केली आहे.