शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दिसणार ‘संजू’ चित्रपटात ?

टीम महाराष्ट्र देशा : ‘संजू’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हापासून प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. अभिनेता संजय दत्त यांच्या संपूर्ण आयुष्यावर आधारित असलेला ‘संजू’ चित्रपट लवकर प्रसिद्ध होणार आहे. या चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची झलक सुद्धा पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.

संजय दत्त तो मुंबई बॉम्बस्फोटात प्रकरणातून सुटल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ‘मातोश्री’वर दाखल झाला होता. तिथूनच त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यामुळे चित्रपटात बाळासाहेबांचे सुद्धा दर्शन होणार का? याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

यामुळे संजय दत्तला लवकर जेलमधून सोडल

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासावेळी संजय दत्तचे नाव पुढे आले होते. पोलिसांनी संजय दत्तच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्याच्या घरात एके ४७ सापडल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणात संजय दत्तला अटक करण्यात आली होती. यानंतर तुरुंगातून सुटल्यावर संजय दत्त ‘मातोश्री’वर दाखल झाला होता. यावेळी सोबत संजय दत्तचे वडील सुनील दत्त देखील मातोश्रीवर उपस्थित होते.

मुंबई आपली आहे आपली. आणि इकडं आवाजही आपलाच हवा; बाळासाहेब नावाचं वादळ…