इंदापूरचा तिढा शरद पवार सोडवणार, दत्तामामा आणि हर्षवर्धन पाटलांना घेऊन एकाचा गाडीत प्रवास

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांना एकाच गाडीत घेऊन इंदापूरचा दुष्काळी दौरा केला.

संकटाच्या काळात एकत्र येत राजकारण किंवा मतभेत विसरून मदतीला धावा अस आवाहन पवारांनी दोघांनाही केले. सरकारच्या मदती बरोबरच संकटावर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवरील संस्थांनी पुढे यावे अस ही मत यावेळी पवारांनी मांडले.

तसेच इंदापूर तालुक्यातून खासदार सुप्रिया सुळे यांना मताधिक्य दिल्याने इंदापूरकरांचे पवारांनी आभारही देखील मानले. संपूर्ण कर्जमाफीसाठी उद्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार असल्याचे देखील यावेळी पवार यांनी सांगितले आहे.