fbpx

तर तुमच्यावर मी बुलडोजर चालवेल ; नितीन गडकरींनी भरला दम

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना कठोर शब्दात दम दिला आहे. आमच्या काळात हाती घेतलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे सांगतानाच रस्त्यांची परिस्थिती वाईट असेल तर कंत्राटदारांवर मी बुलडोजर चालवेल असं गडकरी म्हणाले.

प्रसिद्ध लेखक तुहिन सिन्हा यांच्या ‘इंडिया इन्सपायर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशान सोहळ्याच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. नितीन गडकरी यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये घेतलेल्या पुढाकारासंदर्भात हे पुस्तक आहे. या पुस्तक प्रकाशाचा कार्यक्रम काल मुबंईत पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी वाहतूक मंत्रालयाच्या कामाची माहिती दिली.

… आणि गडकरी चक्कर येऊन कोसळले

आम्ही आतापर्यंत कमीत कमी १० लाख कोटींच्या कामांच्या निविदा दिल्या आहेत आणि हे सांगताना मला गर्व वाटतो की, आतापर्यंत कामाची ऑर्डर घेण्यासाठी एकाही कंत्राटदाराला दिल्लीतील कार्यालयात येण्याची गरज पडली नाही. ही गोष्ट मी अभिमानाने सांगू शकतो असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं. तसेच प्रत्येक कंत्राटदाराला खडसावून सांगण्यात आलं आहे की, जर रस्त्याची कामं नीट झाली नाही. तर तोच बुलडोजर तुमच्यावर फिरवला जाईल आणि हे असं बोलण्यात मला काहीच संकोच वाटत नसल्याचेही गडकरी यावेळी म्हणाले. रस्ते ही राष्ट्रीय संप्पती आहे आणि त्यामुळेच त्यांच्या दर्जाशी कोणतीही तडजोड करता कामा नये अशी आपली भूमिका असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले.

दत्तक बापाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही,पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला