मुंबई : नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशी’ सिनेमामुळे रोहित शेट्टी (Rohit Shetty) सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. रोहितने आजवर अनेक सुपरस्टार कलाकारांसोबत काम केले आहे. त्याचे सर्व सिनेमे हिट होत असून सूर्यवंशी सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने एका मुलाखतीदरम्यान रोहितने आगामी काळात कोणासोबत काम करायला आवडेल याबद्दल सांगितले आहे.
आजवर रोहितचे सर्व सिनेमे लोकप्रिय झाले आहेत. रोहित नेहमीच वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करताना दिसतो. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याने त्याला कोणासोबत आता काम करायला आवडेल यावर भाष्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याला विचारले गेले की, तो लवकरच ‘सलमान (Salman Khan) आणि अमिताभ बच्चन’ (Amitabh Bachchan) यांच्यासोबत काम करणार आहेस. या प्रश्नाला उत्तर देताना रोहित म्हणाला, ‘आता मी याबद्दल काहीच बोलू शकत नाही. मी आता यावर बोलणे खूप बेजबाबदार असेल. कारण सध्या माझ्याकडे कोणतीही कथा नाहीये. पण जेव्हा माझ्याकडे उत्तम कथा येईल तेव्हा मी नक्कीच मी या दोघांसोबत काम करेल, असा खुलासा केला.
दरम्यान सिंघम सिनेमाबद्दल सांगताना रोहित म्हणाला, ‘सिंघमसाठी आमच्याकडे खूप कथा आहेत. मात्र आम्ही अजून काहीच लिहायला सुरुवात केली नाही. तसेच लवकरच माझा सर्कस सिनेमा प्रदर्शित होणार आहे.’ एका माहितीनुसार सिंघम ३ हा सिनेमा कलम ३७० वर आधारित असू शकतो. यावर खऱ्या घटनादेखील दाखवल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे रोहितच्या आगामी सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- मलिकांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करत म्हणाले,’या गाडीत बसलेले…’
- प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही- धनंजय मुंडे
- अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?- संजय राऊत
- ‘…याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात’, भाजपवर राऊतांची टोलेबाजी
- महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव- यशोमती ठाकूर