सहा महिन्यांतच पुन्हा ताकतीनं विकासकामांचा झपाटा लावणार; मुनगंटीवारांच सूचक विधान

टीम महाराष्ट्र देशा :मोठमोठ्या तडजोडीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. मला सुरवातीला वाटलं की आमदार म्हणून पुढील पाच वर्ष काम करताना थोडाफार आरामही करता येईल. पण मी आता आराम करणार नाही, कारण सहा महिन्यांनतर पुन्हा ताकतीनं विकासकामांचा झपाटा लावायचा आहे, असे म्हणत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार सहा महिन्यातच पडेल असे भाकीत केले.

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे  श्री. संत कोंडया महाराज जंयती महोत्सवानिमीत्त आले असताना ते बोलत होते. मुनगंटीवार यांनी धाबा गावाबाबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. मी आमदार असतांना धाब्यात आलो होतो. तेव्हा संस्थानच्या कार्यकर्त्यानी मला रूग्णवाहिकेची मागणी केली होती. मी ती तात्काळ मंजूर केली. यांनतर मागील वर्षी कोंडया महाराज देवस्थान समितीने मला मंदीर बांधकामासाठी पन्नास लाख रूपयांचा निधी मागीतला. पण मी एक कोटी रूपयांचा निधी दिला, असे मुनगंटीवार म्हणाले.

Loading...

देवस्थान संस्थानचे अध्यक्ष अमर बोडलावार, सचिव किशोर अगस्ती, भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गांधी, बबनराव पत्तीवार, सरपंच रोशनी अनमुलवार, बबन निकोडे, येग्गवार अरूण कोंडापे, बाबुराव बोमकंटीवार, स्वप्नील अनमुलवार, दिपक बोनगीरवार, राजु गोहणे यावेळी उपस्थिती होते.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...