अष्टपैलू कामगिरी करणारा रशिद खान भारताकडून खेळणार?

rashid-khan-afp

नवी दिल्ली: अफगाणिस्तानच्या रशिद खानने अष्टपैलू कामगिरी बजावून सनरायझर्स हैदराबादला आयपीएलच्या फायनलचं दुसरं तिकीट मिळवून दिलं. त्यामुळे आयपीएलच्या विजेतेपदासाठी रविवारी चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद अशी फायनल पाहायला मिळेल. आयपीएलमध्ये केलेल्या अफलातून कामगिरीमुळे राशिद खानवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

डन गार्डन्सवरच्या क्वालिफायर टू सामन्यात हैदराबादने कोलकात्यावर 13 धावांनी मात केली. या सामन्यात हैदराबादने कोलकात्याला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याने 20 षटकांत 9 बाद 161 धावांची मजल मारली.

सनरायझर्स हैदराबादच्या विजयाचा नायक ठरला तो रशिद खान. संघाला गरज असताना त्याने 10 चेंडूंत चार षटकारांसह नाबाद 34 धावांची तुफानी खेळी साकारली. त्यानंतर कोलकात्याच्या तीन फलंदाजांना आपल्या भेदक फिरकी गोलंदाजीच्या जोरावर तंबूत धाडत रशिदने हैदराबादच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

Loading...

दरम्यान, कालच्या सामन्यात जबरदस्त बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंग क्रिकेटप्रेमींनी रशीद खानचे विशेष कौतुक केले आहे. तसेच राशिद खानने भारताकडून खेळायला हवं, अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. यासंदर्भात नेटकऱ्यांनी थेट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मेन्शन केले आहेत. मात्र रशिद खानला भारताचं नागरिकत्व देण्याबाबतच्या अनेक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या. मात्र दुसऱ्या देशाच्या नागरिकाला भारताचं नागरिकत्व देण्याचा अधिकार गृहमंत्रालयाचा आहे, असं सुषमा स्वराज म्हणाल्या. तसेच आयसीसीच्या नियमानुसार राशिद खान अफगाणिस्तान व्यतिरिक्त दुसऱ्या देशाकडून खेळू शकत नाही. आयसीसीच्या सामन्यांबाबत ज्या देशांनी करार केला आहे, त्या देशाकडून खेळणारा सदस्य चार वर्षांसाठी दुसऱ्या देशाकडून खेळू शकत नाही.

अफगाणिस्तानचे अध्यक्ष म्हणाले, “आमचा हिरो राशिद खानचा अफगाणिस्तानला अभिमान आहे. मी आमच्या भारतीय मित्रांचे खूप आभारी आहे, ज्यांनी आमच्या खेळाडूंना त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं. अफगाणिस्तानसाठी काय महत्त्वाचं आहे हे राशिदच्या कामगिरीने अधोरेखित केलं आहे. क्रिकेट विश्वासाठी राशिद एक खजिना आहे. तो आम्ही दुसऱ्यांकडे सोपवणार नाही”, असं म्हणत अश्रफ घणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मेन्शन केलं.

1 Comment

Click here to post a comment