शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्याला रामदास कदम उपस्थित राहणार ?

शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्याला रामदास कदम उपस्थित राहणार ?

मुंबई – दसरा जवळ येऊ लागताच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची देखील दरवर्षी मोठ्याप्रमाणात चर्चा होत असते. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावादेखील हॉलमध्येच होणार आहे. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये 50 टक्के उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. मेळाव्याला मुंबईतले काही नगरसेवक, आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते तसंच महापौर उपस्थित राहणार आहेत.

सामान्य शिवसैनिकांना या दसऱ्या मेळाव्याला उपस्थित राहता येणार नाही. त्यात शिवसेना वरिष्ठ नेते रामदास कदम दसरा मेळाव्यात उपस्थित राहणार का नाही याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचं कळतंय. त्यामुळेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांना एन्ट्री नसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. इतकंच नाही तर रामदास कदम यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. मात्र, त्यासाठी किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्याच एका नेत्यानं रसद पुरवल्याचा आरोप करण्यात येत आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी तसा गंभीर आरोप केलाय. खेडेकर यांनी या प्रकरणात थेट रामदास कदम यांचं नाव घेतलं आहे. इतकंच नाही तर त्याबाबत एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. त्यात किरीट सोमय्या, रामदास कदम आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांचा संवाद असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, रामदास कदम यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

महत्वाच्या बातम्या