राहुल गांधी महाराष्ट्रातून लढणार लोकसभा लढणार ?

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी या मतदार संघाबरोबर महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. काँग्रेस उमेदवारासाठी नांदेड लोकसभा मतदार संघ सुरक्षित असल्याने तेथून किंवा मध्य प्रदेशातील एखाद्या जागेवरून राहुल यांना लढविण्यासाठी काँग्रेसकडून चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच राहुल गांधी हे देखील दोन जागांवरुन लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. मोदी लाटेत देखील महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदार काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात यश आले. त्यामुळे राहुल यांच्यासाठी नांदेडच्या जागेची चाचपणी केली जात आहे. या मतदार संघाचे विद्यमान खासदार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी देशातील कोणत्याही मतदारसंघातून लढू शकतात.

Loading...

ते जेथून लढतील त्या ठिकाणाहून किमान 4 ते 5 लाखाच्या मताधिक्याने ते विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. राहुल गांधी महाराष्ट्रातून लढल्यास गुजरात, कर्नाटक, तेलगंणा या आजूबाजूच्या राज्यांतही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा होईल. 1980 पासून नांदेड लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे वर्चस्व आहे. 1989 मध्ये जनता दल तर 2004 मध्ये भाजपा उमेदवार या ठिकाणाहून विजयी झाले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार