fbpx

प्रसंगी विरोधी पक्षाची भूमिका करणार : एकनाथ खडसे

eknath khadse

जळगाव : भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप सरकार विरोधार नाराजी व्यक्त केली. खडसे यांनी शनिवारी पुन्हा एकदा स्वपक्षीयांवर हल्लाबोल करत राज्य सरकारने ३० हजार कोटींचे कर्ज शेतक-यांना माफ केले. यात एकही शेतकरी खूश नाही, किंवा कुठे शासनाच्या निर्णयाचा आनंद नाही. याचे कारण शोधण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

मंत्रीपद सोडावे लागल्याने नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर दिला. पक्ष आपण सोडणार नाही पण जर तुम्ही पक्ष सोडायला मला भाग पाडाल तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, असा सज्जड इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर रावेर येथे दिला होता.

विरोधी पक्षात असताना सत्ताधाऱ्यांना घाम फोडायचो. पुन्हा तीच भूमिका घेण्याची वेळ आली आहे, यापुढे प्रसंगी विरोधी पक्षाची भूमिका करणार असल्याचे सांगितले. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात विविध कार्यक्रम झाले. त्यात खडसे यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. ४० वर्ष पक्षासाठी काम केले. तरी मला पक्षाकडून अशी वागणूक मिळत आहे, मी काय गुन्हा केला याचा जाब विचारण्यासाठी जनतेच्या दरबारात जाणार आहे. दाऊदच्या बायकोशी फोनवर बोललो असतो तर दाऊदने जिवंत सोडले असते काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जे आरोप करण्यात आले त्याची चौकशी झाली मात्र त्यातून निष्पन्न शून्य निघाले, असे ते म्हणाले.

2 Comments

Click here to post a comment