…मग मुंडे-महाजनांवर टीका करणाऱ्या सचिन सावंतचा क्लास पवार घेणार का ?

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर मोदींवर सर्वच थरातून टीकेची झोड उठली होती. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेत हयात नसताना राजीव गांधींवर टीका करणे चांगलं नाही, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

मात्र, शरद पवार यांनी हा सल्ला देण्याआधी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर कॉंग्रेसचे दिवंगत नेते बाळासाहेब विखे यांवर जोरदार निशाणा साधला होता. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची जागा कॉंग्रेसला सोडण्यावरून सुरु असलेल्या वादावरून शरद पवार यांनी १९९१ साली झालेल्या लढाईची आठवण करून देत दिवंगत बाळासाहेब विखेंवर टीका केली होती.

माजी पंतप्रधान राजीव गांधी मिस्टर क्लीन असं बिरूद मिरवत, मात्र तुमच्या वडिलांचा शेवट भ्रष्टाचारी नंबर वनच्या रूपात झाला होता, असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यावर आता शरद पवार यांनी हयात नसलेल्या व्यक्तीवर टीका करणे योग्य नाही असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे. त्यामुळे स्व.बाळासाहेब विखेंवर निशाणा साधताना ते हयात नाहीत याची कल्पना शरद पवारांना नव्हती का ? असा उद्विग्न सवाल विखे यान्हे कार्यकर्ते करत आहेत. तर हा सल्ला देण्यापूर्वी शरद पवारांनी स्वतः एकदा आत्मपरीक्षण करावं अस देखील बोललं जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचारी नंबर वन म्हणून टीका केली आहे, तर दुसरीकडे कॉंगेस नेते देखील आक्रमक झाले आहेत. कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत महाजन आणि मुंडे यांचे नाव घेत एक वादग्रस्त ट्विट केले होते. कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी थेट भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेत भाजपवर टीका केली . सावंत यांनी ट्विटकरत ‘महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी देशासाठी गेले… महाजन आणि मुंढे कशासाठी गेले?’, असा प्रश्न उपस्थित केला होता, मात्र हे ट्विट त्यांनी हटवले होते. आता आता शरद पवार यांनी हयात नसलेल्या व्यक्तीवर टीका करणे योग्य नाही असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे. तोच सल्ला त्यांचा मित्रपक्ष असलेला कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांना देत शरद पवार त्यांचा क्लास घेणार का ? हाच खरा प्रश्न आहे.

https://www.youtube.com/watch?v=2mu3oO8yk_E