IPL स्पॉन्सरशिपसाठी पतंजलीही शर्यतीत उतरणार ?

baba ramdev

नवी दिल्ली- काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिक यांच्यात संघर्ष झाला. यामध्ये २० भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं. या घटनेनंतर देशभरात चिनी वस्तूंविरोधात वातावरण निर्माण झालं.

चीन यांच्यामधील तणावाच्या वातावरणामुळे भारतात चिनी वस्तूंविरोधात संताप व्यक्त होऊ लागला आहे. क्रिकेटवरही याचा परिणाम झाला आहे. देशामध्ये होत असलेल्या तीव्र विरोधामुळे बीसीसीआयने अखेर गुरूवारी विवो या चिनी कंपनीसोबतचा करार मोडला आहे. त्यामुळे या वर्षी आयपीएलमध्ये विवो ही कंपनी प्रायोजक म्हणून असणार नाही.

बीसीसीआयने VIVO कंपनीसोबतचा करार मोडावा यासाठी सोशल मीडियावर दबाव वाढत होता. परंतू गव्हर्निंग काऊन्सिलने पहिल्यांदा VIVO कंपनीची स्पॉन्सरशिप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतू यानंतर देशभरात चाहत्यांची नाराजी व इतर जाहीरातदारांची नाराजी यामुळे बीसीसीआयने एक पाऊल मागे येत वर्षभरासाठी VIVO सोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, InsideSports ने दिलेल्या वृत्तानुसार, Reliance Jio, Byju’s, Amazon आणि इतर काही कंपन्यांनी स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआयसोबत चर्चा करायला सुरुवात केली असल्याचे वृत्त समोर येत असताना आता पतंजलीही या शर्यतीत उतरण्याचा विचार करत आहे असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.

पतंजलीचे प्रवक्ता एस के तिजरवाल यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत यंदाच्या आयपीएलसाठी टायटल स्पॉन्सरशीप मिळवण्याचा आम्ही विचार करत आहोत. पतंजलीला जागतिक बाजारात ओळख मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे सांगितले असून ते लवकरच यासंदर्भातील प्रस्तावही बीसीसीआयकडे पाठवणार आहेत.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

‘राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही निव्वळ अफवा उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत’