कोल्हापूर : महाराष्ट्र व केरळमधील कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येची गंभीर दखल कर्नाटक सरकारने घेतली आहे. या राज्यांमधून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी सक्तीची केली जात आहे. कर्नाटकात प्रवेश करताना 72 तासांपूर्वी केलेली आरटी-पीसीआर चाचणीचे (निगेटिव्ह) प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महाराष्ट्र आणि केरळ राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याची धास्ती कर्नाटक सरकारने घेतली आहे. यामुळेच कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने प्रवासी तसेच शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय राज्यात प्रवेश देण्यात येऊ नये, असे आदेश दिले आहेत.
विशेष म्हणजे महाराष्ट्र सीमेवर कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट उभे करण्यात आलेले आहेत.दरम्यान,कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी त्याचें राज्य सरकारनं घ्यायला हवी. अन्यथा कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवरही बंदी घालू, असा इशारा गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे.
याबाबत मुख्य सचिवांशी तसंच कर्नाटक सरकारशीही चर्चा केली जाईल. असं त्यांनी सांगितलं. पुणे-बंगळूर महामार्गावर कोगनोळी टोल नाका इथं कर्नाटक सरकारनं तपासणी नाका उभारला आहे. आरटीपीसीआर तपासणी झाली असेल तरच महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना प्रवेश दिला जात आहे.त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं.यात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान,यामुळे कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाश्यांवर बंदी घातली जाणार का हा सवाल उपस्थित होत असून या मुद्यावरून देखील दोन राज्यांमध्ये संघर्ष उभा राहण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- जालन्यात कोरोनाचे १३७ नवे रुग्ण, नियम मोडणाऱ्यांविरुद्ध पालिकेची कारवाई
- संजय राठोड यांच्या पाठीशी बंजारा समाजासोबत शिवसेना पक्षही उभा ?
- विमान प्रवाश्यांसाठी खुशखबर; ३० मिनीटात मुंबई गाठणे शक्य
- जीएसटी परताव्यावरून अजितदादा-चंद्रकांतदादांमध्ये रंगणार कलगीतुरा?
- कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाची कॉंग्रेसला रणनीती बदलावी लागणार ?