पंकजा मुंडे भाजप सोडणार का ? खा. पूनम महाजन म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकांमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडेचा धक्कादायक पराभव झाला. त्यांच्या हक्काच्या परळी मतदारसंघामधून त्यांचा भाऊ धनंजय मुंडेंकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता त्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान,पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत असा दावा खा. पूनम महाजन यांनी केला आहे. रॅलीला जास्तीत जास्त लोकांनी येण्यासाठी ती पोस्ट टाकण्यात आली होती. याचा राजकीय अर्थ काढू नका असं आवाहन त्यांनी माध्यमांना केले आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्याविषयीच्या प्रसार माध्यमातील बातम्या निराधारअसल्याचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे या लवकरच राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहे. याचा संकेत त्यांनी रविवारी फेसबुकवर पोस्ट करत दिला होता. मात्र त्यांनी अजून एक संकेत दिला आहे. यावरुन त्या लवकरच भाजपला रामराम ठोकणार अशा चर्चांणा उधाण आले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरील भाजपचा उल्लेख हटवला आहे.

‘आपण मला वेळ मागत आहात, मी आपल्याला वेळ देणार आहे. पुढील मार्ग व दिशा ठरवण्यासाठी, आपली शक्ती काय व लोकांची अपेक्षा काय हे पाहून पुढील निर्णय घेण्यासाठी सर्वजण १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर या’, या आशयाची भावनिक पोस्ट शेअर करत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसह सर्वांना बुचकळ्यात टाकलं आहे.

परंतु गेल्या महिन्याभरात झालेल्या घडामोडीनंतर अनपेक्षितपरित्या भाजपला विरोधीपक्षात बसावे लागल्याने आपले राजकीय भवितव्य अंधारात दिसत असल्याने स्वपक्षावर विधानपरिषदेत स्थान मिळवण्यासाठी पंकजा मुंडे खटाटोप करत आहेत असा सूर उमटू लागला आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...