बॉलीवूडला संपवण्याचं कारस्थान सहन करणार नाही – उद्धव ठाकरे

uddhav

मुंबई : बॉलीवूडला संपवण्याचा किंवा मुंबईतून बाहेर इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही हे कारस्थान सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता योगी आदित्यनाथ आणि भाजप यांना दिला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी (15 ऑक्टोबर) मल्टीप्लेक्स आणि सिनेमागृह मालकांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

राज्यात कोरोना व्हायरस साथीमुळे बंद असलेले सिनेमागृह लवकरच सुरू करण्यात येतील, असं आश्वासन यावेळी ठाकरे यांनी दिलं. दरम्यान, उत्तर प्रदेशातील नोएडा येथे चित्रपटसृष्टी निर्माण करणार असल्याच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेबाबत ठाकरे यांनी भाष्य केलं.

“मुंबईतील बॉलीवूडमध्ये हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बनतात. या चित्रपटांचे चाहते जगभरात सर्वत्र आहेत. सिनेमासृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योगक्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे,”असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:-