fbpx

वेळ आली तर रजनीकांत यांच्यावर टीका करायला लाजणार नाही- कमल हसन

Kamal-and-Rajini

टीम महाराष्ट्र देशा- वेळ आली तर आपण रजनीकांत यांच्यावर टीका करायला लाजणार नाही असं वक्तव्य राजकीय पक्ष स्थापन करत नव्या कारकिर्दीला सुरुवात करणा-या कमल हसन यांनी केलं आहे. एका तामिळ वृत्तवाहिनीकडून आयोजित प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कमल हसन यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. रजनीकांत यांच्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना हसन यांनी हे वक्तव्य केलं आहे.

कमल हसन यांनी नुकतीच ‘मक्कल निधी मय्यम’ पक्षाची स्थापना केली असून लवकरच रजनीकांतदेखील आपल्या पक्षाची घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर या विधानाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे . मात्र ही टीका वैयक्तिक नसून, रजनीकांत यांच्या राजकीय पक्षाच्या योजना आणि तत्वांवर असेल’ असं स्पष्ट केलं
नेमकं काय म्हणाले कमल हसन

‘वेळ आली तर आपला सहकारी अभिनेता रजनीकांतवर टीका करायला आपण लाजणार नाही. मात्र ही टीका वैयक्तिक नसून, रजनीकांत यांच्या राजकीय पक्षाच्या योजना आणि तत्वांवर असेल.रजनीकांत यांना पक्षस्थापना करु दे, नाव ठरवू दे. माझ्या पक्षाचं एकच लक्ष्य असणार आहे ते म्हणजे समाजकल्याण. आणि हे मी आधीच स्पष्ट केलं आहे. रजनीकांत यांनाही त्यांच्या पक्षाच्या योजना जाहीर करु देत, त्यानंतर काही साम्य आहे का पाहता येईल.जरी काही मतभेद असले तरी मी फक्त त्यांच्या राजकीय गोष्टींवर टीका करेन, वैयक्तिक नाही. ही आमची राजकीय प्रतिष्ठा आहे’ .